Fri. Oct 2nd, 2020

कडधान्याचे भावही आता शंभरी पार

अवकाळी पावसामुळे अन्नधान्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात अन्नधान्याच्या  किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून कांदा, भाजीपाला यांच्या वाढलेल्या दराने त्रस्त झालेल्यांना आता या कडधान्याच्या वाढत्या दराचा सामना करावा लागणार आहे.

दिवाळीनंतर बाजारात नवीन अन्नधान्याची आवक सुरू होते मात्र यावेळी थोड्या उशिराने ही आवक सुरू झाल्याने  अन्नधान्याच्या किंमतीत गेल्यावर्षीच्या तुलनेत  30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे.

यामुळे अनेक कडधान्य घाऊक बाजारात 100 रुपये किलोच्या घरात पोहचले आहेत.

किरकोळ बाजारातही कडधान्य 100 ते 120 रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे.

गेल्या 3-4 वर्षांपूर्वी बाजारात तुरीच्या डाळींनी किलोमागे शंभरी ओलांडली होती. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून रेशन दुकानात स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून दिली

यावेळी मात्र अद्यापतरी स्वस्त दराबाबत सरकारकडून कोणतीही हलचाल झालेली दिसत नाही

त्यामुळे ग्राहकांना महागड्या दरात डाळी आणि कडधान्य खरेदी करावी लागणार

यावेळी तूरडाळीचे दर काही प्रमाणात कमी असून मूग डाळीने मात्र दरवाढीचा उच्चांक गाठला आहे.

अन्नधान्याच्या  किंमती याप्रमाणे

घाऊक बाजारात तूरडाळ 70 ते 90 रुपये किलो

किरकोळ बाजारात ती 80 ते 100 रुपये किलो

मूगडाळ घाऊक बाजारात 85 ते 100 रुपये किलो

किरकोळ बाजारात मूगडाळ 110 ते 120 रुपये किलो

पूर्ण मूगही घाऊक बाजारात 80 ते 100 रुपये असून किरकोळ बाजारात 90 ते 110 रुपये किलो

हिच परिस्थिती इतर कडधान्ये आणि डाळींच्या बाबतीत

त्यामुळे किरकोळ बाजारात हिरवा वाटाणा 120 ते 125 रुपये किलो

मटकीचे दरही घाऊक बाजारात 75 ते 95 रुपये किलो

किरकोळमध्ये हे दर 85 ते 100 रुपये किलो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *