Sat. May 15th, 2021

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका, भाज्यांचे भाव ‘एवढ्या’ किमतीने कोसळले

अवकाळी पावसातून सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट ओढवलंय. प्रचंड आवक वाढल्याने अन् वातावरण ढगाळ झाल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळू लागलेत. कोथिंबीर आणि मेथीच्या एक पेंढीला अवघ्या 50 पैशांचा दर मिळू लागलाय. तर वांगी 5 रुपये, गाजर 10 रुपये, लिंबू 2 रुपयेने विकली जातीये. यामुळं मावळ,पिंपरी-चिंचवड आणि चाकण बाजार समितीत येणारा शेतकरी चिंतेत आहे.

अवकाळी पावसाचा फटका पावसाच्या दमदार सरींमुळे पालेभाज्या उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. मागील दोन दिवस सातत्याने आलेल्या अवकाळी पावसाने चाकण मार्केट मध्ये भाजीपाल्याचा अक्षरशः कचरा झाला. कोथिंबीरीची एक जुडी चक्क १ रुपया दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मेथी, शेपूच्या जुड्याही अवघ्या तीन ते चार रुपयांना विक्री केल्याचे शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झालीय. चाकण मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर वाटाण्याची आवक झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांसह मध्यप्रदेशातून दहा ट्रक वाटाण्याच्या आवक झाली. वाटाण्याचे भाव देखील कोसळले आहेत. वाटण्याला प्रतीकीलोला अवघा 20 ते 25 रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय, मागील काही महिन्यांत सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने काय खाव काय नको, असे गणित करणाऱ्या गृहिणींना भाजीपाल्याने बरेच दिवसांनंतर दिलासा दिला असला तरी शेतकरी मात्र पुरता देशोधडीला लागला आहे.

आताचे आणि आधीचे दर

                    आताचे               आधीचे

कोथिंबीर         50पै ते 5रु          2रु ते 10 रु (1 पेंढी)

मेथी               50पै ते 7रु           3रु ते 10रु (1 पेंढी)

वांगी              5रु ते 14रु           15रु ते 35रु (प्रति किलो)

लिंबू               2रु ते 7रु            10रु ते 15 रु (प्रति किलो)

गाजर             10रु ते 22रु        30रु ते 40रु (प्रति किलो)

पावटा            10रु ते 26रु       20रु ते 41रु (प्रति किलो)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *