पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या १३ जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानावर आहेत. जवळपास ७१ टक्के रेटिंगसह आवडत्या नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे.
मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल वेबसाईट जगातील ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, युनायटेड किंगडम या देशातील नेत्यांचे रेटिंग ट्रॅक ठरवत असते. त्यानुसार मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सच्या १३ जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानी आहेत.
मे २०२०मध्ये मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल वेबसाईटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगली रेटिंग दिली होती. २०२०मध्ये त्यांना ८४ टक्के रेटिंग देण्यात आली होती. तर मे २०२१मध्ये त्यांना ६३ टक्के रेटिंग देण्यात आले.