Thu. Jan 21st, 2021

सौदीचे प्रिन्स दुतोंडी, भारताला आश्वासनं, पाकला 1.4 लाख कोटी!

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहंमद बिन सलमान हे भारतभेटीवर असताना भारताने त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घातल्या. यावेळी सौदीच्या प्रिन्सने दहशतवादी हल्ल्याविरोधात आपण भारतासोबत आहोत, असं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात पुलवामा हल्ल्याचा उल्लेखही प्रिन्सने केला नाही. उलट पाकिस्तानमध्ये गेल्यावर प्रिन्सने पाकिस्तानवर पैशांची उधळण केली आहे.

प्रिन्सची भूमिका दुटप्पी

दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांवर दबाव आवश्यक आहे, असं प्रिन्सने भारतभेटीत म्हटलं खरं…

पण पाकिस्तानात गेल्यावर मात्र आपली दुटप्पी भूमिका दाखवून दिली आहे.

याच आठवड्यात आपल्या पाकिस्तान दौऱ्यात पाकला 20 अब्ज डॉलरची (1.4 लाख कोटी रुपये) आर्थिक मदत प्रिन्सने दिली आहे.

याशिवाय सौदी अरेबियातील तुरुंगात असणाऱ्या 2100 पाकिस्तानी कैद्यांच्या सुटकेची घोषणा देखील केली आहे.

पाकिस्तानला 20 अब्ज डॉलर्सची मदत देणाऱ्या प्रिन्सने भारतात 100अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची केवळ इच्छाच व्यक्त केली आहे.

महंमद बिन सलमान यांच्या या कृत्याने दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्यांवर दबाव कसा आणणार हा प्रश्नच आहे.

दहशतवादाला विरोध करावा असं सांगत पाकिस्तानसारख्या दहशतवादी कृत्यांना चालना देणाऱ्या देशालाच आर्थिक पाठबळ देत आहे.

भारतासोबत असल्याचा केवळ आभास निर्माण करत आहे.

त्यामुळे ज्या प्रिन्स मोहंमद बिन सलमानकडून भारताला दहशवादविरोधी कारवाईसंदर्भात अपेक्षा आहे, तो देश खरंच भारताला मदत करेल, अशी शक्यता धूसर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *