Corona Virus च्या पार्श्वभूमीवर कैद्यांना पॅरोलवर सोडण्याची शक्यता

Corona Virus ची भीती आता भारतातही मोठ्या प्रमाणावर आहे. याविरोधात जनता कर्फ्यूदेखील करण्यात आला. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांनी कुठेही घोळका करू नये, असे निर्देश आहेत. अशा परिस्थितीत तुरुंगांमधील गर्दी कमी करण्यासाठी कैद्यांनाही पॅरोलवर सोडून देण्यात यावं, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
सुप्रिम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे आता कोणत्या गुन्ह्यातील कैद्यांची पॅरोलवर सुटका होऊ शकते यावर विचार सुरू आहे. यासंदर्भात कायदेशीर सचिव आणि राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या एका उच्चस्तरीय समिती करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.
जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आता जगभरात आहेत. १४ हजारांहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत कैद्यांनाही तुरुंगात ठेवणं हे हानीकारक ठरू शकतं. याचा विचार करून कैद्यांना पॅरोलवर किंवा अंतरिम जामिनावर सोडण्यात येणं शक्य आहे का, याचा विचार सुरू आहे. हे शक्य असल्यास त्यांना सोडून देण्यात यावं. मात्र नेमक्या कोणत्या गुन्ह्यातील कैद्यांना अशा प्रकारे तात्पुरतं मुक्त करावं, हा प्रश्न आहे.