प्रियांका झळकणार Hollywoodच्या ‘या’ बायोपिकमध्ये

बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत आपलं नाव गाजवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा लवकरच एक बायोपिक करणार आहे. हा बायोपिक हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक बेरी लेविन्सन करणार आहेत.
एका कार्यक्रमात प्रियंकाने याबाबतची माहिती दिली होती.
कसा असेल बायोपिक ?
प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू ओशो रजनीशांची शिष्या माँ आनंद शीलांच्या जीवनावर आधारित आहे.
प्रियांका या बायोपिकमध्ये आनंद शीला यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
भारतात जन्मलेल्या माँ आनंद शीला या अमेरिकी नागरिक होत्या.
त्या आचार्य रजनीशांच्या शिष्या आणि प्रवक्त्या होत्या.
त्यांच्यावर अनेकांची हत्या केल्याचे आरोप असून त्यावरुन अनेक वादही झाले होते.
याआधी प्रियंकाने बॉलिवडमध्ये प्रसिद्ध बॉक्सर ‘मेरी कोम’ हिची व्यक्तिरेखा साकारली होती.
हॉलिवूडमधला हा तिचा पहिला बायोपिक असणार आहे.
त्यातील प्रियंकाच्या नकारात्मक भूमिकेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.