Wed. May 18th, 2022

प्रियांका गांधी उत्तरप्रदेश मुख्यमंत्री पदाचा चेहरा?

विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उत्तर प्रदेशमध्ये रणधुमाळी सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश राजकारणात भाजपच्या आमदारांचे बंड, पक्षप्रवेश, यादव कुटुंबातील सूनेचा भाजपप्रवेश यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असे विचारल्यानंतर ‘मीच तर सगळीकडे दिसत आहे’, असे वक्तव्य प्रियांका गांधी वाड्रा यांनी केले. प्रियंका गांधी यांनी दिलेल्या या उत्तरामुळे संपूर्ण देशात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदासाठी माझा चेहरा सर्व ठिकाणी दिसत आहे. उत्तर प्रदेश निवडणूकीत काँग्रेस पक्ष चांगले प्रदर्शन करेल. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत प्रश्न विचारला असता, माझाच चेहरा सर्वात जास्त दिसत आहे,’ असे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच पुढे त्या म्हणाल्या, ‘आम्ही उत्तर प्रदेशमध्ये प्रलंबित विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत, तसेच त्यासाठी जनतासुद्धा आमच्योसोबत असेल. उत्तर प्रदेशातून देशाचे राजकारण निश्चित होत असते. तसेच पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर उत्तराखंडमध्ये जनता काँग्रेसच्या बाजूने आहे’, असेही काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.

1 thought on “प्रियांका गांधी उत्तरप्रदेश मुख्यमंत्री पदाचा चेहरा?

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.