Mon. Oct 25th, 2021

प्रियंका गांधी फक्त दिसायला सुंदर – भाजपा नेता

प्रियंका गांधी-वढेरा यांची राजकारणातील प्रवेशाची उत्सुकता अखेर बुधवारी संपुष्टात आली आहे.

काँग्रसने उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाच्या  सरचिटणीस पदी प्रियंका गांधी यांची नियुक्ती केली आहे.

यासंर्दभात प्रियंका गांधी फक्त दिसायला सुंदर’ आहेत आणि  त्या आधारावर मत मिळत नसतात, त्यासाठी राजकीय कर्तृत्व असायला हव असं वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे नेते  विनोद नारायण झा यांनी केले आहे.

प्रियंका गांधी रॉबर्ट वढेरा यांच्या पत्नी असून रॉबर्ट वढेरा यांचा भूखंड घोटाळ्यात समावेश आहे असे ही नारायन  झा  म्हणाले आहेत. यांच्या या विधानावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसने 2 महिन्यांआधी प्रियंका यांच्याकडे निम्मा उत्तर प्रदेश  म्हणजेच जवळपास 80 ते 40 जागा सोपवल्या आहेत.

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर  हा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला मानला जातो .

मात्र आता हा भाग प्रियंका गांधी यांच्या प्रदेशात येतो त्यामुळे काँग्रेसच्या या  ‘हुकमी एक्का’ ने भाजपला चांगलाच दणका दिला आहे.

प्रियंका गांधीच्या राजकीय प्रवेशाने सत्तेत काय बदल होतो हे पाहणे महत्त्तवाचे ठरणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *