Promise Day : चला तर मग करुया Promise

Valentine Week मधील आजचा पाचवा दिवस. म्हणजेच आपला Promise Day. या दिवशी आपण आपल्या प्रिय व्यक्तींना वचन देतो,की आयुष्यभर आपण नेहमी एकत्र राहू. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपण एकमेकांची साथ कधीच सोडणार नाही. आपल्या Partner ला Promise तर सगळे करतात.पण बहुतेक वेळा असे Problems येतात की, आपण आपल्या पार्टनर सोबत कसे राहावे, हे समजतच नाही. हेच confusion दूर करायचं असेल, तर जाणून घ्या ‘या’ खास कानगोष्टी-

 

संपूर्ण बोलणं ऐकून घ्या-

खूप वेळा असे होते की, आपण पार्टनरचे बोलणे ऐकून न घेताच टोकाचा निर्णय घेतो.

अर्धवट ऐकल्याने आपण गैरसमज होतो. अशा वागण्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.

यासाठी आपल्या पार्टनरचे संपूर्ण बोलणे ऐकून घ्या आणि नात्यात गोडवा निर्माण करा.

दिलेला शब्द पाळा-

आपण आपल्या पार्टनरला Whatsapp,Instagram आणि Call वर अनेक Promise करतो.

पण दिवसभराच्या धावपळीमध्ये आपण काही गोष्टी विसरून जातो.

त्यामुळे दोघांमध्ये अविश्वास निर्माण होतो.

हा अविश्वास वाढत जाऊन मग संशयाचे वातावरण तयार होते आणि आपल्या नात्यासाठी धोका निर्माण होतो.

यासाठी आपले दिलेले शब्द विसरू नका.

दुसऱ्यांसमोर कमी लेखू नका-

मित्र- मैत्रिणींसमोर किंवा नातेवाईकांसमोर स्वत:चा मोठेपणा दाखवण्यासाठी आपल्या पार्टनरचा अपमान करण्याची चूक करू नका.

अशा गमतीतल्या काही शब्दांमुळे आपला पार्टनर आपल्याला काहीच महत्त्व देत नाही, अशी भावना मनात निर्माण होते.

अशाच गोष्टी मनात रुजून शेवटी नात्याचा स्फोट होतो.

यासाठी पार्टनरचे चारचौघांत कौतुक करायला शिका.

तुमचे नाते गुलाबाप्रमाणे बहरेल.

सरप्राईज प्लॅन करा-

नात्यात मधुरपणा आणण्यासाठी कधीतरी पार्टनरसाठी सरप्राईज प्लॅन करा.

त्यामुळे तुमच्या नात्यात विश्वास तर टिकून राहील, त्याचबरोबर नात्यात प्रेम देखील वाढेल.

Jai Maharashtra News

Recent Posts

‘ज्यांचे मंत्री तुरुंगात गेले त्यांनी फार बोलू नये’

आज मंत्रिमंडळ विस्तार झाला. या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही. त्यावरून…

11 hours ago

नितीश कुमार यांचा राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिलाय. बिहारमध्ये 5 वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू…

12 hours ago

मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. त्यांनी आतापर्यंत…

14 hours ago

पावसाळी अधिवेशन स्वातंत्र्य दिनानंतर

राज्यात मोठ्या सत्तांतरणानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाने नवे सरकार स्थापन झाले. या…

15 hours ago

‘मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही’

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्यापासूनच एकाही महिलेचे नाव चर्चेत नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारकडून अचानक धक्का दिला…

16 hours ago

राठोडांना मंत्रिपद देणं दुर्देवी – चित्रा वाघ

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला आहे. एकूण १८ आमदारांनी मंत्रिपदाची…

16 hours ago