Sun. Jul 5th, 2020

मुंबईच्या रस्त्यावर नग्न फिरणाऱ्या माथेफिरूचा प्रताप!

मुंबईतील नागपाडा परिसरात एक मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणारा इसम नग्नावस्थेत फिरत होता. तसंच अर्वाच्य शिवीगाळही करत होता. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी पोलिसांना बोलावून घेतलं, तेव्हा या विकृत इसमाने चक्क पोलीस कॉन्स्टेबलचं बोट दाताने चावून त्याचे दोन तुकडे केले.

कोण होता हा माथेफिरू?

आरोपीचं नाव मोहम्मद शकील शब्बीर हुसैन सलमानी असं असून तो 45 वर्षांचा आहे.

मानसिकदृष्ट्या तो अस्वस्थ असल्याचं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

बुधवारी संध्याकाळी नागपाडा भागात पोलीस पेट्रोलिंग सुरू असताना एक इसम नग्नावस्थेत भर रस्त्यात फिरत असल्याची तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली. हा इसम जोरजरात शिव्याही देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यावर पोलीस या व्यक्तीची शहानिशा करायला पोहोचले.

पोलिसांनी सलमानीला दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र सलमानी पोलिसांकडे पाहून शिव्या देऊ लागला.

त्याला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस त्याच्या जवळ गेले. तेव्हा त्याने जनार्दन सरकारे नामक कॉन्स्टेबलच्या डाव्या हाताचं बोट इतक्या जोरात चावलं, की त्याचे दोन तुकडे झाले.

डॉक्टर सध्या कॉन्स्टेबल सरकारे यांच्यावर उपचार करत आहेत. मात्र बोट पुन्हा जोडलं जाणं शक्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. सलमानी हा वेड्यांच्या इस्पितळातही काही दिवस दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या वेडेपणामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. मात्र रस्त्यावर अशा पद्धतीने नग्न भटकणाऱ्या मानसिकदृष्ट्या अस्वस्थ इसमाकडे कुटुंबातल्या कुणाचंच लक्ष का नाही, याची विचारणा केली जात आहे. अशा व्यक्तींना बिना देखरेखीचं बाहेर पाठवणं इतरांसाठीही अपायकारक होऊ शकतं. या विक्षिप्त व्यक्तीपायी कॉन्स्टेबल सरकारे यांना आपल्या हाताचं बोट गमवावं लागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *