Thu. Apr 22nd, 2021

‘PUBGवर बंदी आणा’, 11 वर्षांच्या मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

PUBG गेमवर बंदी आण्यासाठी अवघ्या 11 वर्षाच्या मुलाने सरळ मुख्यमंत्र्याना पत्र लिहलं आहे.

आहाद असं त्या मुलांच नाव असून त्याने  राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं आहे.

PUBG गेम हा घातक असून तो वाईट गोष्टी आणि हिंसेला प्रवृत्त करणार गेम आहे अस आहादने या राज्य सरकराला लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे.

‘PUBG गेम  हा वाईट प्रवृत्ती, हिंसा ,खून ,हत्या राग,बदला, लुटमार ,गु़डांगीरी अशा गोष्टींना खतपाणी घालतो आहे. आणि जर लवकरात लवकर या गेमवर बंदी आणली गेली नाही तर आपन कायदेशीर मार्गाने त्यासाठी प्रयत्न करू असेही आहादने म्हटंल आहे.

केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शिक्षण मंत्री विनोद तावडे  याच्यांसह  इतर सात जणांचा या पत्रात त्यांने उल्लेख केला आहे.

त्यांच्या या पत्रावर अजून कोणतंही उत्तर न मिळाल्याने  उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय आहादने घेतला आहे.

या अगोदर PUBG गेममुळे विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येऊ नये म्हणून जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थी संघटनेने परीक्षा जवळ आल्याने PUBGवर गेमवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी राज्यपालांकडे केली होती.

हे ही वाचा- Pubgला टक्कर देण्यासाठी Xiomi चा नवा Survival Game

 PUBG वाला है क्या? 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मगंळवारी ‘परीक्षा पे चर्चा  2.0’ या कार्यक्रमात एका पालकाने आपला मुलगा ऑनलाईन गेम खेळत असल्याने त्याचं अभ्यासाकडे लक्षच नाहीये आशी तक्रार केली.

यावर उत्तर देताना पंतप्रधानांनीही “PUBG वाला है क्या?” असं विचारलं होतं.

काय आहे PUBG गेम –

PUBG हा   प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊंड गेम आहे.

यामध्ये 100 खेळाडू एका बेटावर शस्त्रे वापरून एकमेकांशी लढाई करत स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतात.

खेळाचे सुरक्षित क्षेत्र वेळोवेळी कमी होते आणि जिवंत खेळाडूंना एकमेकांशी लढण्यासाठी सुरक्षित क्षेत्रात जावे लागते.

सर्वांवर मात करुन जो शेवटचा खेळाडू किंवा एखादा संघ जिवंत राहतो, तो या खेळाचा विजेता ठरतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *