Fri. Feb 21st, 2020

आजीच्या घरी आलेल्या चिमुरडीसोबत घडली धक्कादायक घटना

लिफ्टच्या 2 मजल्यांमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या 7 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ही घटना पुण्यातील मोमीनपुरा परिसरात शनिवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी घडली.

नशरा रेहमान खान असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात केली जात आहे.

कशी घडली ही दुर्देवी घटना

  • घटनेच्या दिवशी नाजीमा पुण्यातील मोमीनपुरा भागातील झोहरा सोसायटीत राहणाऱ्या आजीकडे आली होती.
  • त्या दिवशी नशरा दिवसभर घरीच खेळत होती.
  • सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ती आजीकडून पैसे घेऊन खाऊ आणण्यासाठी खाली गेली होती.
  • त्यानंतर थोड्या वेळाने आजीला तिच्या रडण्याचा आवाज आल्याने बाहेर येऊन पाहिले असता नशरा लिफ्टच्या 2 मजल्यांमध्ये अडकलेली होती.
  • अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने येऊन नशराची सुटका केली आणि गंभीर जखमी अवस्थेत तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
  • मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *