Jaimaharashtra news

पुण्यातील मराठमोळी ‘बाहुबली’ डॉक्टर

पुण्यातील डॉक्टर शर्वरी इनामदार यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडिओत त्या साडीवरच पुशअप्स, डेड लिफ्ट आणि इंक्लाइन बेंच प्रेस सारखी एक्सरसाइज करताना दिसत आहेत. वेट शिवाय एक्सरसाइज करून स्वतःला सुपरफिट केले जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हाच मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी साडी नेसून वेट ट्रेनिंग केली आहे.

हा व्हिडीओ प्रचंड आता वायरल झाला आहे. बऱ्याच दिवसांनी जिम सुरू झाल्यानं आनंदोत्सव साजरा करण्यासाठी साडी नेसून आल्याचं डॉक्टर शर्वरी यांनी सांगितलं आहे. डॉक्टर असल्यानं त्यांना व्यायामाचं महत्व माहिती आहे. त्यामुळेच त्या गेल्या अनेक वर्षांपासून जिमला जातात. चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी व्यायाम करावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. लोक सध्या त्यांना झिंगाट डॉक्टर म्हणत आहेत.

Exit mobile version