Fri. Feb 21st, 2020

पुण्यात बोकड बळी देणाऱ्या कुटुंबाच्या घरात घुसून उधळली पूजा!

नवरात्रीदरम्यान अष्टमीच्या निमित्ताने होणाऱ्या पुजेत बोकडाच्या बळीचा प्रकार प्राणीमित्रांनी उधळला. कोथरूड येथील एखंडे कुटुंबियांकडून या पुजेच आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बकरा कापण्यात येणार  होता. मात्र याची माहिती मिळताच प्राणीमित्र थेट एखंडे यांच्या घरात घुसून पूजा उधळून लावली.

 

घरात घुसून पूजा उधळल्याचा आरोप एखंडे कुटुंबाने केला आहे. या दरम्यान बाचाबाची आणि धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून पोलीस तक्रार करण्यात आली.  अलंकार पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार करण्यात आली. यावेळी बळी दिलेलं बोकडही पोलीस स्टेशनात आणण्यात आलं. बळी दिलेल्या बोकडाला पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आलं.

 

पीपल फॉर ऍनिमल संघटनेच्या रीना रॉय यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच त्यांनी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचीही तक्रार देण्यात आली आहे.

 

तर एखंडे कुटुंबियांविरोधात ऍनिमल क्रुएलिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *