Sun. Jan 24th, 2021

कोरेगाव -भीमा चौकशी आयोगाचे चौथ्या टप्प्यातील कामकाज सुरू

कोरेगाव – भीमा येथील हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाचे पुण्यातील चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून सुरू झालं आहे.पण साक्ष तपासणी घेणारे वकील अनुपस्थित राहिल्याने आयोगाचे फारसे कामकाज होऊ शकले नाही. या टप्प्यातील कामकाज 15 मार्चपर्यंत सुरू राहील.आयोगाचे कामकाज पूर्ण झाले नसल्याने राज्य सरकारकडून आयोगाला ८ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.1 जानेवारी 2018  रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार होऊन सणसवाडी येथे दोन गटातील चकमकीत एक जण ठार झाला. त्यातून राज्य भरात दलितांनी आंदोलन सुरू केले.पुणे पोलिसांनी दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख शोमा सेन, कार्यकर्ते महेश राऊत व केरळच्या रोना विल्सन यांना अटक करण्यात आली.या प्रकरणामुळे महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारकडून आयोगाला 8 मे पर्यंत मुदतवाढ

या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे.एन.पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा द्विसदस्यीय आयोग स्थापन केला.

त्यानुसार मुंबई आणि पुण्यात आयोगाचे सुनावणी घेण्याचे कामकाज सुरू आहे.

आयोगाकडून पुण्यात पहिल्याचं टप्प्यात 3 ते 6 ऑक्टोंबरपर्यंत चार जणांच्या साक्षी तपासण्याचे कामकाज करण्यात आले.

दुसऱ्या टप्प्याचे 12 ते 16 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्याचे कामकाज 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान झाले.

तर, चौथ्या टप्प्याचे कामकाज सोमवारपासून जुन्या जिल्हा परिषदेत सुरू आहे.

सोमवारी शरद दाभाडे यांची साक्ष नोंदवण्याचे आणि उलट तपासणीचं काम होणार होते.

परंतु काही कारणास्तव वकील अनुपस्थित राहिल्यानं कामकाज होऊ शकलं नाही.

तर कोरेगाव भीमाचे माजी उपसरपंच आणि कोरेगाव भीमा हिंसाचारातील प्रमुख साक्षीदार गणेश फडतरे यांना मंगळवारी आयोगासमोर हजर राहण्यासाठी बजावले.

आयोगाचे कामकाज पूर्ण झाले नसल्याने राज्य सरकारकडून आयोगाला 8 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *