Thu. Oct 22nd, 2020

पुणे होर्डिंग दुर्घटना: कारवाईला वेग

पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी कारवाईला वेग आला आहे. आताच दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे. तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डींग्ज काढण्याचे काम करत होते.

मात्र, होर्डींग्जवरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान होर्डिंग काढण्याचे काम घेतलेल्या ठेकेदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार मल्लिकार्जुन मनकापूरे, जीवन मांढरे आणि कामगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होर्डिंग्जच्या रुपात काळाचा घाला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *