Tue. Apr 20th, 2021

पुण्यात शेतीपंपासाठी उपकरणे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग

पुण्यातील लॉजी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या  कंपनीमध्ये भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात इमारतीचे नुकसान झाले आहे.

पुण्यातील लॉजी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या  कंपनीमध्ये भीषण आग लागल्याने मोठ्या प्रमाणात इमारतीचे नुकसान झाले आहे. या कंपनीच्या टेरेसवर अनधिकृतपणे शेतीपंपासाठी लागणारी उपकरणे  तयार करण्यात येत असल्याचं बोललं जात आहे. ही उपकरणे 2014 पासून तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीमध्ये 15  कामगार काम करत होते. ही आग रात्री साडेअकराच्या सुमारास इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे लागली आहे.

या आगीची माहिती स्थानिकांना मिळताचं दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला आटोक्यात न येणारी आग उशिरा मोठ्या प्रयत्नाने विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. दरम्यान अरूंद रस्त्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत असल्याचे स्थनिकांचे म्हणणे आहे.

या कंपनीमध्ये  15  कामगार काम करत होते परंतु कोणतीही सुरक्षा विषयक अग्निशामक उपकरणे येथे बसवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ही आग मोठया प्रमाणात पसरली आणि आटोक्यात आणण्यास अथक प्रयत्न करावे लागलं. यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची शक्यता आहे. परंतु कंपनीचे यामध्ये नुकसान झाले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *