Wed. Oct 21st, 2020

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण, एप्रिलपासून धावणार

पुणे मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यातला संत तुकाराम ते फुगेवाडी या 5 किमीच्या मार्गाचं काम पूर्ण होत आलं आहे. एप्रिलपासून हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

याशिवाय वनाज-रामवाडी मार्गिकेतील आनंद नगर ते गरवारे हा 5 किमीचा टप्पासुद्धा जून अखेरपर्यंत पूर्ण करून जुलै महिन्यात प्रवाशांसाठी खुला होणार आहे.

राज्याच्या विविध शहरांमध्ये महा मेट्रोच्या (Maha Metro) माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.

या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित, संचालक सुब्रमण्यम रामनाथ, कार्यकारी संचालक एन. एम. सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर असून मार्च 2022 पर्यंत संपूर्ण 32.50 किमी मार्गावर, दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सुरू होईल, असे बैठकीत सांगण्यात आले. मेट्रोच्या कामाबाबत शिंदे यांनी समाधान व्यक्त करत, वेळापत्रकापूर्वी काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची सूचना केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *