Fri. Jan 21st, 2022

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधू यांना मुंबई पोलिसांकडून अटक

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका वृद्ध महिलेच्या तक्रारीच्या आधारे व्यावसायिक कामात फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

एका ७० वर्षीय वृद्ध महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम ४०६, ४२०, ४६४, ४६७ आणि ४६८ अंतर्गत विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी दिली. या वृद्ध महिलेने श्रीकांत परांजपे, शशांक परांजपेविरोधात व्यवसायात फसवणूक केल्याची तसेच बनावट दस्तऐवज वापरल्याची तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

सध्या प्राथमिक तपास सुरु असून सध्या परांजपे बंधूना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असून मुंबई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *