Sat. May 15th, 2021

पुणे- मुंबई लोहमार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द

पुणे-मुंबई लोहमार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात लांब पल्ल्याच्या चार रेल्वे एक्सप्रेस (Railway Express) रद्द 3 अन्य मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. मंकी हिल ते कर्जत दरम्यान लोहमार्गावरील कामामुळे या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत?

पनवेल- पुणे- पनवेल ही गाडी 21 ते 30 जानेवारी दरम्यान रद्द होणार.

CSMT ते पंढरपुर ही गाडी 23 ते 25 आणि 30 जानेवारीला रद्द असेल.

पंढरपूर ते CSMT ही गाडी 24 ते 26 आणि 31 जानेवारी रोजी रद्द असेल.

CSMT ते विजापूर 22 26 आणि 29 जानेवारी रोजी रद्द असेल

विजापूर वरून निघणारी CSMT गाडी 23 , 27 आणि 29 जानेवारी रोजी रद्द असेल

अन्य मार्गांनी वळवलेल्या गाडया

भुसावळ पुणे भुसावळ ही गाडी 21 ते 30 जानेवारी दरम्यान मनमाड दौंड मार्गे वळविण्यात आली आहे.

CSMT ते कोल्हापूर कोयना एक्सप्रेस 21 ते 30 जानेवारी दरम्यान पुणे कोल्हापूर, पुणे दरम्यान चालेल पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणार नाही.

हा बदल लक्षात घेऊन पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे मध्य रेल्वेच्या विभागाने करण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *