Thu. Jul 9th, 2020

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना अटक…

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना ससून रुग्णालयातील डॉक्टरांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तृप्ती देसाई यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना काळे फासण्याच्या इशारा पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला होता त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना गुरुवारी कात्रजमधील राहत्या घरातून ताब्यात घेतले.

 नेमकं प्रकरण काय आहे ?

  • ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून, शासन आणि अपंगांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
  • मुख्यमंत्र्यानी त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करत डॉ.चंदनवाले यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला होता.
  • या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
  • गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना कात्रजमधील राहत्या घरातून अटक केली.

भुजबळांची भेट टाळण्यासाठी विधानसभेची बेल आली धावून…

अबब! त्यांनी चक्क बंगलाचं उचलला…

रितेशच्या माफीवर संभाजीराजेंची प्रतिक्रिया…

14 खरिप पिकांच्या हमी भावात वाढ, नरेंद्र मोदी सरकारचा मोठा निर्णय

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *