Sun. Oct 17th, 2021

पुणे पोलिसांनी मानले जॅकलीन फर्नांडीसचे आभार!

मुंबई : देशात कोरोनाचे थैमान सुरूचं आहे. कोरोनामुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले आहे. देशाची परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे. सद्या पसरलेल्या कोरोनाच्या या संकट काळात अनेकजण इतरांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. शिवाय या संकट काळात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसनेही मदतीसाठी हात समोर केला आहे आणि या मदतीसाठी पुणे पोलिसांनी जॅकलीन फर्नांडीसचे आभार मानले आहेत. जॅकलीनने आपल्या सोशल मीडिया हँडलवर मेहनती पुणे पुलिस दलासाठी लिहिले की, “मी पुणे शहर पोलिस को सलाम करते फ्रन्टंलाईनवर खूप मेहनतीने काम करत आहे आणि या महामारीच्या युद्धात आपण जिंकलो पाहिजे यासाठी निस्वार्थीपणे आपली मदत करत आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत”. अशा आशयाचं ट्विट जॅकलीनने केलं. त्यानंतर जॅकलिनच्या ट्विटला पुणे पोलीसांनी रिट्विट केलं.

पुणे पोलिसांनी जॅकलीन फर्नांडीसचे आभार मानले आहेत. शिवाय पुणे पोलीसांनी ट्विटरवर लिहिलं की, आपले सहकार्य आमच्या कार्यसंघासाठी खूप उपयुक्त ठरेल. आणि जे फ्रन्टंलाईनवर काम करत त्यांना यातून प्रोत्साहित मिळेल”. जॅकलॅकलीन फर्नांडीसने नुकतीच ‘यू ओनली लिव वन्स’ (वायओएलओ) फाउंडेशनची सुरुवात केली असून ज्याद्वारे अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून समाजाच्या तळागाळात पोहोचून काम करण्यात येणार आहे. संस्थेच्या माध्यमातून 1 लाख भोजन, मुंबई पुलिस दलासाठी मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करणार असून या कठीण काळात भटक्या जनावरांच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे. जॅकलीन ही गरजू लोकांच्या मदतीसाठी ती सदैव तयार असते. एवढेच नव्हे, तर मागील वर्षी महाराष्ट्रातील पथराडी आणि सकुर गावातील गावकऱ्यांच्या पोषणासाठी ‘एक्शन अगेंस्ट हंगर फाउंडेशन’ सोबत तिने सहयोग केला होता. तसेच पूरग्रस्तांच्या घरांचे पुनर्निर्माण असो की मुलांच्या पोषणासाठीचे कार्य, आपल्या सकारात्मक दृष्टीकोनासोबत, जॅकलीनने त्या लोकांमध्ये प्रेम आणि आनंद पसरवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *