Sat. Mar 28th, 2020

सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या राजकीय भूमिकांना ‘No Entry’!

पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थ्यांनी राजकीय भूमिका घेऊ नये असा अजब फतवा काढण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यांसाठी हा फतवा काढण्यात आला आहे. दरम्यान यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मात्र प्रचंड नाराजी आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत यंदाच्या वर्षी वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थ्यासाठी एक नियमावली करण्यात आली आहे.

वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाकडून नियमावली तयार करण्यात आलीय.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाची भूमिका घेऊन शासनविरोधी कृत्य करू नये.

राष्ट्रविरोधी, समाज व जातीय विरोधी व राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये

तसं हमीपत्र सही करुन घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार आहे.

नियमांचे पालन नकेल्यास वसतिगृहातील प्रवेश रद्द होणार.

तसंच राष्ट्रविरोधी, समाज, जातीयविरोधी आणि राजकीय पक्षांचे उपक्रम राबवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये असंही सांगण्यात आलं आहे. हे सर्व नियम मान्य असल्याचं हमीपत्र दिल्यानंतरच वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. नियमांचे पालन न केल्यास वसतिगृहातील प्रवेश होणार रद्द होणार असल्याचे विद्यापीठाकडून सागंण्यात आलं आहे. या आदेशानंतर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *