कोरोनामुळे पुण्यातील शाळा तीन दिवस बंद

कोरोना व्हायरसने जगभरात हैदोस मांडला आहे. कोरोनामुळे हजारो लोकांना जीवाला मुकावे लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक मोठमोठे कार्यक्रम आणि महोत्सव रद्द करण्यात आले आहेत.
तसेच कोरोनाचा धसका अनेक कंपन्यांनी घेतला आहे. यामुळे शेअर बाजारावरही याचा परीणाम झालेला दिसून येत आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसचे रूग्ण महाराष्ट्रातही आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात आली आहे. याचा धसका राज्यातील शाळांनी घेतला आहे.
पुण्यातील तीन शाळा रविवार पर्यंत बंद राहँणार आहेत. तसेच कात्रज, नांदेड सिटी, धायरी भागातील तीन शाळा बंद राहणार असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले आहे.
यासंंबंधी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले नसले, तरी खबरदारी म्हणून शाळा प्रशासनाने स्वतः हा निर्णय घेतला आहे.
कोरोना व्हायरचे जे रुग्ण आढळले आहेत, ते याच भागातील असल्याने ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.