Wed. May 18th, 2022

पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली; ‘या’ दिवशी होणार मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पंजाबमध्ये १४ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगानुसार, पंजाब विधानसभा निवडणूक १४ फेब्रुवारीऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे. १६ फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती आहे. त्यामुळे सर्व पक्षांनी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहित मागणी केली होती. त्यामुळे स्थानिकांची मागणी आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी लिहिलेल्या पत्रानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पंजाब विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली आहे.

पंजाबमध्ये संत रविदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. या दिवशी अनेक पंजाबवासीय उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या गोवर्धनपूर येथे संत रविदास यांच्या जन्मगावी जातात. त्यामुळे अनेक मतदार १४ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या निवडणुकीत सामील होणार नाहीत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी निवडणूक आयोगाला केली होती. त्यामुळे आता १४ फेब्रुवारी ऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.