Jaimaharashtra news

अश्विनची आयपीएलमधून माघार

दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा गोलंदाज आर आश्विन याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. आश्विनचे कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाल्यानं त्याने हा निर्णय घेतला आहे. तसंच कुटुंबीय संकटातून बाहेर पडल्यानंतर आयपीएलमध्ये पुन्हा सामील होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही अश्विननं सांगितलं आहे. अश्विननं त्याच्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.

‘उद्यापासून मी यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून ब्रेक घेत आहे. माझं कुटुंब आणि नातेवाईक कोरोनाशी लढा देत आहेत. अशा कठीण प्रसंगात मी त्यांच्यासोबत असणं जास्त महत्वाचं आहे. सर्व ठीक झाल्यास मी पुन्हा खेळण्यासाठी प्रयत्नशील असेन. धन्यवाद दिल्ली कॅपिटल्स’,असं ट्वीट अश्विननं केलं आहे.
कुटुंबिय आणि जवळचे नातेवाईक कोरोनाशी लढत असल्याने अशा कठीण प्रसंगी कुटुंबासोबत राहणं योग्य असल्याचं म्हणत आर.अश्विन यानं आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version