Sun. Jun 13th, 2021

केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची उघड्यावर लघवी; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

स्वच्छ भारतचा नारा देणाऱ्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच उघड्यावर लघवी करताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

 

हे मंत्री आहेत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

राधा मोहन सिंग त्यांच्या कारजवळ असलेल्या एका भिंतीकडे तोंडकरुन लघवी करत आहेत, तर त्यांचे सुरक्षा अधिकारी त्यांच्याकडे पाठ फिरवून उभे आहेत.

 

बिहारमध्ये मोतिहारी गावाच्या दौऱ्यावर असताना राधा मोहन सिंग यांनी हा प्रताप केला. मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाला त्यांच्या मंत्र्यांनी हरताळ फासला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *