Mon. Dec 6th, 2021

काँग्रेस खासदार राहुल गांधी गुजरातमधील स्थानिक न्यायालयात हजर

काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमधील सूरत येथील दंडाधिकारी कोर्टात हजर झाले आहेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी हा खटला दाखल केला असून याप्रकरणी राहुल गांधी न्यायालयात हजर झाले आहेत.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी गुरुवारी सकाळी गुजरातमधील सूरत येथे पोहोचले. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीदरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. राहुल गांधींनी आपल्या भाषणात ‘सारे मोदी चोर है’ असे म्हटले होते. या विषयावर राहुल गांधींवर मोदी समाजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुर्णेश मोदी यांनी एप्रिल २०१९ मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, राहुल गांधी निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण मोदी सामुदायाची बदनामी करत आहेत. राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ मध्ये कर्नाटकमधील सभेत ‘नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं सारखं आडनाव कसं काय? सर्व चोरांचं मोदी हेच आडनाव कसं काय?’,असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं.

राहुल गांधी याआधी ऑक्टोबर २०१९ मध्ये न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी आपण निर्दोष असल्याचं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *