Wed. Apr 14th, 2021

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भर कार्यक्रमात मुलीने विचार असा सवाल की त्यावर राहुल गांधी म्हणाले…

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुद्दुचेरीमध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते या कार्यक्रमात राहुल गांधींनी शाळेतील मुलांशी संवाद साधत होते. या कार्यक्रमात राहुल गांधी हे अगदीच वेगळ्या रुपामध्ये दिसून आले असून राहुल गांधी यांनी निळ्या रंगाचा टीशर्ट आणि पॅण्ट अशा एकदम यंग लूकमध्ये कार्यक्रमात पोहचले होते. कार्यक्रमामध्ये मुलांनी राहुल यांना त्यांच्या खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक प्रश्न विचारले. मात्र यादरम्यानच एका मुलीने राहुल यांना, ‘सर’ असं म्हटलं असता त्यांनी, ‘माझं नाव सर नसून राहुल आहे,’ असं म्हटलं आणि त्यानंतर मुलांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. “तुम्ही तुमच्या मुख्यध्यापकांना सर म्हणा. मला हवं तर तुम्ही राहुल अण्णा (मोठा भाऊ) असं म्हणू शकता,” असं राहुल यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. राहुल यांना सर म्हणणाऱ्या मुलीने आपला प्रश्न पूर्ण करत, “तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?,” असं विचारलं. या मुलीने विचारलेला प्रश्न ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राहुल यांनी या प्रश्नाला हसून उत्तर देताना, “या प्रश्नाचं उत्तर मी एखाद्या वेगळ्या दिवशी देईन,” असं म्हटलं. राहुल यांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. या कार्यक्रमात राहुल गांधी यांना मुलांनी राजकारण वगळता तुमचे इतरही मित्र आहेत का?, तुम्हाला मैत्रिणी आहेत का?, असतील तर त्या कोणत्या क्षेत्रात काम करतात असा प्रश्नही एका मुलाने राहुल यांना विचारले. यावर राहुल गांधी यांनी म्हटलं “माझे अनेक मित्र आहेत. काही राजकारणातील आहेत तर काही बाहेरचे आहेत. काहीजण असे आहेत जे मला त्यांचा राजकीय शत्रू मानतात. मात्र मी त्यांना माझा मित्रच मानतो, ” असं उत्तर राहुल यांनी दिलं. राहुल गांधी यांना राजीव गांधी हत्येप्रकरणी मुलांनी विचारणा करत म्हटलं, एलटीटीईने तुमच्या वडीलांना मारलं यासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना, “माझ्या वडीलांची हत्या झाली तेव्हा मला फार दु:ख झालं होतं. मात्र या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये काहीच द्वेष नाहीय. मी त्यांना माफ केलं आहे.” असं उत्तर दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *