Wed. Oct 27th, 2021

‘मोदींची सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे’ – राहुल गांधी

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर आरोप करण्याची संधी कधीच सोडत नाहीत. त्यातच आता राहुल गांधी यांनी ‘बेरोजगारीच्या’ मुद्द्यावरुन मोदी सरकारला टार्गेट केलेलं दिसून येत आहे.

यंदाचा बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षात सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. 2017-18 या वर्षातील भारतातील बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के इतका आहे. अहवालानुसार 1972-73 पासून ते आजपर्यंतचा बेरोजगारीचा हा सर्वाधिक दर आहे.

राहुल गांधींचे ट्वीट

देशात तरुणांसाठी नोकऱ्याच नाहीत.

अहवालातून बेरोजगारी संदर्भातील भीषण परिस्थिती समोर आलेली आहे.

2017-18 मध्ये 6.5 कोटी तरुण बेरोजगार होते.

आता बेरोजगारीचा दर 45 वर्षांमधील सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे.

त्यामुळे आता मोदींची सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे.

त्यांनी यावेळेस #HowsTheJobs असा हॅशटॅग वापरला आहे.

देशातील बेरोजगारी अहवालावरुन राहुल गांधी यांनी PM नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ‘हुकूमशाह मोदी यांनी आता सत्तेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे’, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्वीट केले  की, ‘वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन हुकूमशाहने दिले होते. मात्र सत्तेतील त्यांच्या 5 वर्षानंतर आलेल्या एका अहवालाने सर्वांसमोर भीषण वास्तव समोर आणले.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *