राहूल गांधी यांच्या मोदींना ‘जागतिक रंगभूमी दिना’च्या शुभेच्छा!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी World Theatre Day चं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. मोदींना ‘जागतिक रंगभूमी दिना’च्या उपरोधिक शुभेच्छा दिल्या.
‘मिशन शक्ती’ यशस्वी झाल्यानंतर DRDO चं सगळीकडून अभिनंदन होत आहे.
राहुल गांधी यांनीही ‘मिशन शक्ती’ बद्दल DRDOचं अभिनंदन केलंय.
तुमच्या कामाचा आम्हाला अभिमान आहे असं Tweet राहुल गांधी यांनी केलंय.
मात्र याचवेळी आपल्या Tweet मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जागतिक रंगभूमी दिना’च्या शुभेच्छा राहुल गांधी यांनी दिल्या आहेत.
Well done DRDO, extremely proud of your work.
I would also like to wish the PM a very happy World Theatre Day.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 27, 2019
27 मार्च हा जगभरात World Theatre Day म्हणून साजरा केला जातो.
या संधीचा वापर करत राहुल गांधींनी मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी आणि BJP च्या जाहीरातबाजीला काँग्रेस पक्षातर्फे नेहमीच नावं ठेवली जातात.
विरोधक मोदी यांच्या अनेक गोष्टींची ‘नाटक’ म्हणून संभावना करत असतात.
राहुल गांधी यांनीही आपल्या Tweet मधून पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं आहे.
काय आहे मिशन शक्ती ?
अमेरिका, रशिया, चीन सारख्या बलाढ्य देशानंतर अंतराळातील महाशक्ती ठरलेला भारत चौथा देश आहे.
भारताने LEO satellite ला मोडून काढत विजय मिळवलेला आहे.
याबाबत पंतप्रधान मोदींनी या मोहिमेशी संबंधित सर्व वैज्ञानिकांचे अभिनंदन केलं.
भारताने सर्वच क्षेत्रात प्रगती करत असताना आता अंतराळातही स्वतःचे स्थान पटकावत आहे.