Wed. Aug 10th, 2022

राहुल महाजनची तिसरी बायको तब्बल १८ वर्षांनी लहान

मुंबई: राहुल महाजन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने अनेक टीव्ही रिअलिटी शो केले आहेत. लग्नंतर कधी दारू, ड्रग्स आणि पत्नीला मारहाण प्रकरणावरून राहुल नेहमीच चर्चेत होता. श्वेता सिंह आणि डिंपी गांगुली यांच्याशी लग्न आणि घटस्फोट झाल्यानंतर राहुलच्या आयुष्यात नतालिया इलिनाची एण्ट्री झाली. २०१८ मध्ये राहुलनं नतालियाशी लग्न केल. त्यांच्या लग्नात काही जवळचे नातेवाईक उपस्थित होते. नतालिया ही मूळची कजाकिस्तानची आहे. नातालिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. नतालियाच्या सोशल मीडियावर तिचे मॉडर्न कपड्यांसोबतच पारंपरिक भारतीय पेहरावातील फोटो शेअर करत असते.नातालियाच्या सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. नतालिया बॉलिवूड अभिनेत्रींनाही टक्कर देताना दिसते. नतालिया पारंपरिक भारतीय पेहरावात आणि मॉडर्न लूकमध्ये फार सुंदर दिसते. राहुल महाजन आणि नतालियाच्या लग्नाची चर्चा ही सोशल मीडियावर फार झाली होती. राहुल महाजन याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, नतालियानं धर्म परिवर्तन केलं आहे. या मुलाखतीत राहुल महाजन म्हणाला, ‘आता नतालियानं हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. मी नेहमीच तिला शिव-पार्वतीबद्दल सांगत असतो. पती-पत्नीचं नातं हे नेहमीच शिव-पार्वतीसारखं असायला हवं असं मी तिला सांगतो.’ राहुल आणि नतालिया यांच्या जवळपास १८ वर्षांचं अंतर आहे. जेव्हा या दोघांनी लग्न केलं त्यावेळी राहुल ४३ वर्षांचा होता तर नतालिया २५ वर्षांची होती. पण वयातील फरकाचा त्यांना नात्यावर काहीच परिणाम झालेला नाही असं राहुल म्हणतो. राहुल महाजनचं पहिलं लग्न श्वेता सिंहशी झाल होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. दोघंही घटस्फोट घेत वेगळे झाले. त्यानंतर एका रिअलिटी शोच्या माध्यमातून त्यानं डिंपी गांगुलीशी लग्न केलं मात्र ते ही लग्न फार काळ टिकलं नाही. डिंपीनं राहुलवर कौंटुंबीक हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. आणि आता २०१८ मध्ये त्यानं नतालियाशी लगीनगाठ बांधली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.