Tue. Mar 2nd, 2021

रेल्वेला बुकिंगला ‘या’ दिवसापासून सुरूवात

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून त्याला रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे ट्रेन, बस सर्वच बंद करण्यात आलं आहे. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे त्यानंतर हा लॉकडाऊन संपणार की वाढणार याबद्दल लोकांमध्ये भीती आहे. मात्र या सर्वांत मोठी बातमी ही आहे, की लवकरच रेल्वे बुकिंग सुरू होणार आहे. १५ एप्रिलपासून रेल्वेची तिकिटं उपलब्ध होतील.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर सर्वजण घरातून बाहेर पडणं बंद केलं आहे. १४ एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी ट्रेन सेवा बंद करत असल्याचं सरकारने घोषित केलं होतं. तसंच कुठेही प्रवास करायचा नसल्यामुळे लॉकडाऊनपूर्वी बाहेर गेलेले आणि तिकडेच अडकलेले अनेकजण परतीसाठी रेल्वे सुरू होण्याची वाट पाहत आहेत. या सर्वांसाठी आनंदाची बातमी ही आहे, की लॉकडाऊन संपताच रेल्वे बुकिंगची सुविधा सुरू होत आहे.

मोबाईल apps वरून ऑनलाईन तिकिटं बुकिंगची सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे आता लॉकडाऊननंतर बाहेर पडणं लोकांना शक्य होणार असल्याचं यातून दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *