केंदीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचाही समावेश; रेल्वे प्रवाशांना मिळणार नव्या सुविधा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
देशाचा अर्थसंकल्प गुरुवारी सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या अर्थसंकल्पात कोणत्या सवलती देणार आहेत, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षीपासून केंद्रीय अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्पही मांडण्यात येतोय. यावर्षीच्या अर्थसंकल्पात रेल्वे प्रवाशांना कोणत्या सोई आणि सुविधा मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
म्हणूनच, या अर्थसंकल्पाची रेल्वे प्रवासी आतुरतेने वाट पाहत आहेत.