Sun. Jan 16th, 2022

राज्यातल्या बहुतांश भागात पावसाची दमदार हजेरी

सुमारे 3 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. 8 सप्टेंबरपर्यंत राज्यातल्या बहुतेक भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तसंच येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पावसामुळे मुंबईतील लोकल रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

रस्ते वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. वेस्टर्न तसंच इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला, सायन भागांत पाणी साचलं आहे.

मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, वसई, पालघर या भागांत मुसळधार पाऊस पडतोय.

समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुबंईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, पुढील ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे-

1. अमृत नगर जंक्शन

2. गांधी नगर, घाटकोपर

3. साकीनाका जंक्शन

4. नेताजी पालकर चौक, अंधेरी

5.गणेश मिष्टान्न, अँटॉप हिल

6. 90 फीट रोड, धारावी

7. अंधेरी सबवे

8. न्यूव लिंक रोड, मालाड

9. शिवाजी चौक, ऍटोप हिल

10. वेह मेट्रो स्टेशन

11. मिलन सबवे, सांताक्रुझ

12. वडाळा किंग सर्कल

13. पोइसर, सबवे

14. हिंदमाता जंक्शन

15. दादर टी टी सर्कल

16. पोस्टल कॉलनी, चेंबूर

17. सुर्वे जक्शन, LBS रोड कुर्ला

18. माझगाव डॉक यार्ड जंक्शन

कोल्हापूरमध्येही पावसाची बॅटिंग

पुरातून सावरण्याआधीच पुन्हा एकदा कोल्हापुरात पावसाने हजेरी लावल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

राधानगरी धरणाच्या सहा नंबरच्या दरवाजातून 1428 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.

मुख्य दरवाजातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

 

पुणे जिल्हात धरणं भरली

पुणे जिल्ह्यातील धरणंही पावसाने भरून वाहत आहेत.

खडकवासला धरणातून 27000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *