Sun. Mar 7th, 2021

पुण्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस

देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. पुणे, पिंपर-चिंडवड परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त होती. अशा परिस्थितीत आता पुण्यात अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे आता पुण्यातील वातावरण बदलून गेलं आहे.

पुणे वेधशाळेने यासंदर्भात अंदाज वर्तवला होता. मध्यरात्रीनंतर पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. आज सकाळी वातावरण मोकळं होतं. आकाश निरभ्र होतं त्यामुळे पाऊस पडण्याची चिन्हं दिसत नव्हती. मात्र दुपारच्या सुमारास अचानक पुन्हा विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस सुरू झाला. रायगड जिल्ह्यील महाड आणि पोलादपूर येथेही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. मुंबईमध्येही २६ ते २८ मार्चदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

औरंगाबादमध्येही वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पाऊस पडला. औरंगाबाद ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्यामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *