Sun. Apr 18th, 2021

प्रतीक्षा संपली! मुंबईत जोरदार पावसाची जोरदार हजेरी

आज आणि उद्या दोन दिवस मुंबईत मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली होती. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

आज आणि उद्या दोन दिवस मुंबईत मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली होती. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दररोज मुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आज पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ, बेलापूर या विभागात जोरदार पाऊस पडला आहे.

मुंबईत पावसाची हजेरी

मागील 1 तास पासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे.

आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ, बेलापूर या विभागात जोरदार पाऊस पडला आहे.

पालघर जिल्ह्यातील काही भागातही आज सकाळ पासून जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे.

कोकणातही जोरदार पावसाला सुरूवात

कोकणात गेल्या २४ तासात पावसाचा जोर कायम आहे.कालपासून पावसाने कोकणात तळ ठोकला आहे.

या पावसामुळे शेतीला जास्त फायदा झाल्याने सध्या बळीराजा सुखावलेला आहे.

तर शेतीच्या कामात गुंतला आहे.कोकणातील रत्नागिरी जिल्हात सर्वात जास्त पावसाच्या सरासरीची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *