Thu. May 6th, 2021

राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत सलग दुसऱ्या दिवशी सातारा, पुणे जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली, तर औरंगाबाद, नगर जिल्ह्यांत दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन एखादी पावसाची सर कोसळली. दुपारी कडक ऊन, सायंकाळी मेघगर्जना, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस असे वातावरण सध्या पुण्यासह विविध जिल्ह्यांत झालेले आहे.

मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे. हा पट्टा कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा या मार्गाने गेला आहे. परिणामी तेलंगणसह आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या राज्यांत पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.२८, २९ आणि ३० एप्रिल या दिवशी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *