Wed. Jan 19th, 2022

राष्ट्रगीतानंतर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

मनसेच्या महामोर्च्याची राष्ट्रगीताने सांगता झाली आहे. भाषण संपल्यानंतर राज ठाकरे यांनी मोर्च्याला उपस्थित असलेल्यांना आवाहन केले.

मुंबई बाहेरुन आलेल्यांनी सावकाश जा, तसेच राजमुद्रा असलेल्या झेंड्याचं अपमान होणार नाही, याबाबत काळजी घ्या, असे ही राज ठाकरे म्हणाले. या महामोर्च्याला मुंबईशिवाय राज्यातील विविध जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते गाडी घेऊन मुंबईत दाखल झाले होते.

राज ठाकरे यांनी जवळपास २० मिनीटं भाषण केलं. या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मोर्च्याला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिल्याने त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मुस्लिमांच्या मुद्द्याने त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुस्लिमांनी काढलेल्या मोर्च्यांचा अर्थ लागलं नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.

भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

  • आज आम्ही मोर्च्याला मोर्चाने उत्तर दिलं आहे. अजून उन्माद घातलात तर दगडाला दगडाने उत्तर आणि तलवारीला तलवारीने उत्तर मिळेल. एकोप्याने राहा, उगीच ताकद दाखवू नका.
  • २०१२ च्या मोर्च्यात मी एका बांग्लादेशी दंगेखोराचा पासपोर्ट दाखवला होता ज्यांनी ह्याच आझाद मैदानावर पोलीस भगिनींच्या अब्रूवर हात टाकला होता.ह्यांची मजल बघा. ह्यांना हुसकावलंच पाहिजे.
  • अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे.
  • माझा देश म्हणजे धर्मशाळा आहे का? कुठूनही येतात आणि आपल्या देशात घुसखोरी करतात. बेरोजगारी आणि अन्य महत्त्वाचे मुद्दे आहेत तसंच घुसखोरीवरचं संकट हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
  • सध्या देशात फक्त दोन भूमिकांमधून पाहिलं जातं. सरकारवर टीका केली तर भाजपविरोधी, अभिनंदन केलं तर समर्थक. ठोस भूमिका म्हणून काही आहे की नाही. तीच आम्ही घेतो.
  • कोणतेही कायदे समजून न घेता ताकद दाखविण्यासाठी जे मोर्चे काढले गेले त्यांना तुम्ही आज चोख प्रत्युत्तर दिलंत.

भारतात असलेल्या बांगलादेश आणि पाकिस्तानमधील घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्च्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून मनसैनिक या महामोर्च्यात सहभागी झाले होते.

या मोर्च्यासाठी अनेक दिवसांपासून मनसेकडून वातावरण निर्मिती करण्यात आली.मोर्च्यासाठी मनसेचे राजमुद्रा असलेले स्पेशल टीशर्ट देखील पाहायला मिळाले. या महामोर्च्यासाठी नाशिकहून मुंबईच्या दिशेने १० हजार राजमुद्रा असलेले झेंडे पाठवण्यात आले होते.

उत्सफुर्त प्रतिसाद

मनसेच्या मोर्च्याला उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या संख्येत या मोर्च्यात सहभागी
झाले होते. गिरगाव चौपाटी नजीक असलेल्या हिंदु जिमखान्यापासून या महामोर्च्याला सुरुवात झाली. तर आझाद मैदानावर पोहचल्यानंतर या मोर्च्याची सांगता झाली. यानंतर या मोर्च्याचे रुपांतर
सभेत झाले.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त

मनसेच्या या महामोर्च्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली. ठिकठिकाणी चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला होता. तसेच पोलिसांवर ताण येऊ नये यासाठी इतर तुकड्यांचही पाचारण या ठिकाणी करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *