Tue. Jul 7th, 2020

महाराष्ट्रावर संकट आणेल त्यांना बडवण्याची ताकद ठेवा, राज ठाकरेंचा तरुणांना सल्ला

ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तरूणांना केलं आहे.

तसेच काँग्रेसच्या भारत बंदला पाठिंबा देण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

पुण्यात मनसेतर्फे आयोजित स्वरराज करंडक 2018 स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते.

यावेळी त्यांनी काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहनही केलं.

 

 राज ठाकरेंचा तरुणांना सल्ला

  • पुण्यात मनसेतर्फे आयोजित स्वरराज करंडक 2018 स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राज ठाकरे यांची उपस्थिती
  • सोहळ्यात बोलत असताना तरूणांना दिला सल्ला
  • ढोल ताशा पथकातील वादक जेवढ्या जोरात ढोल बडवतात तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर संकट आणणा-यांना बडवून काढा असा सल्ला
  • तसेच काँग्रेसच्या भारत बंदला पाठिंबा देण्याचं आवाहनही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *