Fri. Oct 2nd, 2020

राज ठाकरे आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महापालिका निवडणुकीत दारुण पराभवानंतर मनसेनं पुन्हा एकदा मराठी मुद्यालाच हात घातला आहे.

 

पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची चिंतन बैठक पार पडली.  या बैठकीत ही रणनिती ठरवण्यात आली.

 

पण, चिंतनापेक्षा ही बैठक गाजली ती राज ठाकरे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या खडाजंगीने.

 

महापालिकेतील दारुण पराभवानंतर नेते आणि पदाधिकारी या बैठकीत आमनेसामने उभे ठाकले होते.

 

पक्षवाढीसाठी मनसेकडून मोर्चेबांधणीसाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेत. त्यासंदर्भातलं मार्गदर्शनही राज ठाकरेंनी यावेळी केले.

 

त्याबरोबरच नेत्यांना कानपिचक्याही दिल्या. पण या बैठकील शिशिर शिंदे मात्र अनुपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *