Fri. Dec 3rd, 2021

राज ठाकरे यांची सभा पावसामुळे रद्द, 10 ऑक्टोबरला कसबा गणपती दर्शनाला!

पुण्यात राज ठाकरे यांची होणारी सभा पावसामुळे रद्द झाली. शहरात मध्यवस्तीत असलेल्या मैदानावर मुसळधार पाऊस झाला. यामुळे मनसैनिक नाराज झाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सरस्वती विद्या मंदिराचा मैदानात जाहीर सभा होणार होती.

सभा सुरू होण्यास काही अवधी शिल्लक असतानाच या भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

सायंकाळी 6 वाजता ही सभा होणार होती. मात्र, मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सभा रद्द करावी लागली.

मनसेचा प्रचाराचा नारळ खर तर पुण्यात फुटणार होता.

राज काय बोलणार याची उत्सुकता लागली होती.

ईडी चौकशीनंतर राज शांत होते. त्यामुळे यावेळी काय बोलणार याकडे लक्ष होतं.

आता सभा रद्द झाल्यावर 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता राज ठाकरे चार मतदारसंघातील उमेदवाराना घेऊन कसबा गणपतीच्या दर्शनासाठी आणि आरतीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *