Fri. Dec 3rd, 2021

मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल- राज ठाकरे

भांडूप येथे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.

 संबंधित बातमी- ED ची नोटिस आली, तरी माझं थोबाड थांबणार नाही- राज ठाकरे

काय म्हणाले राज ठाकरे?

प्रत्येक निवडणुकीत नागरिकांच्या आयुष्यातील 5 वर्षं जातात.

निवडणुकीत वाट्टेल ती आश्वासनं दिली जातात आणि पुढे लोकं विसरतात.

महापालिकेच्या शाळांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या नोकरीत प्राधान्य हे आश्वासन होतं, काय झालं त्या आश्वासनाच?

आधुनिक तंत्र वापरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढणार? कुठे गेलं तंत्रज्ञान?

खड्डे पडत आहेत, कंत्राटदार कमवतोय, तरीही आपण प्रश्न विचारत नाही

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र राज्याला कर्जबाजारी केलं.

शेतकऱ्यांच्यात निराशा पसरली आहे, असं भाजपने 2014 च्या जाहीरनाम्यात म्हणलं होतं.

काय वेगळं घडलं, महाराष्ट्राच्या डोक्यावरचं कर्ज वाढलं आहे, शेतकरी निराश आहे, तो आत्महत्या करतोय, काय बदल झाला?

हे ही वाचा- राज्याला प्रबळ, कणखर विरोधी पक्षाची गरज आहे – राज ठाकरे

कोणतं आंदोलन अर्धवट सोडलं?

त्रिभाषासूत्र ठीक आहे. मात्र मुंबईत चौथी भाषा आणायचा प्रयत्न कराल तर बांबू बसेल.

टोलमुक्त महाराष्ट्र करू असं भाजपचं जाहीरनाम्यात आश्वासन दिलं होत?

कुठे झाला टोलमुक्त महाराष्ट्र?

जे 78 टोल बंद झाले ते टोल महाराष्ट्र सैनिकांच्या दणक्यामुळे झालं.

एल्फिन्स्टनच्या दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे आंदोलन केलं, त्यामुळे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला.

पण पुन्हा तो परिसर सरकारी आशीर्वादाने फेरीवाल्यानी भरले.

आंदोलनं आम्ही करायची, सरकार काहीच करणार नाही.

तरीही माध्यमं मला विचारणार की तुम्ही आंदोलनं अर्धवट सोडता?

आझाद मैदानावर रझाकारांच्या मोर्च्याच्या वेळेस रझाकारांनी पोलिसांवर हात उचलला, त्यावेळेस बाकीचे पक्ष शेपट्या घालून बसले होते, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढला होता. पोलिसांवरच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता.

नोटबंदीच्या दहाव्या दिवशी मी बोललो होतो, की सरकारच्या या निर्णयामुळे उद्योगधंदे बंद पडत जाणार, देशावर बेकारीचं सावट येणार.. आणि तसंच घडलं.

आहेत त्या नोकऱ्या जात आहेत, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत, ही वेळ आणली कोणी?

अटकेपार झेंडे फडकवणारा महाराष्ट्र थंड का?

आणि अशा वेळेस सरकारला प्रश्न विचारायचा कोणी? असा हतबल महाराष्ट्र मी नाही बघू शकत? अटकेपार झेंडा नेणारा महाराष्ट्र आज गलितगात्र पडलाय, थंड झालाय. महाराष्ट्राला आसपासच्या घटनांचा राग का येत नाहीये? चीड का येत नाहीये कोणाला?

या रागाला आवाज द्यायचा असेल तर सक्षम विरोधी पक्ष हवाय. आज विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधाऱ्यांच्यात जाऊन बसलाय.

मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील 2700 झाडं भर रात्री कापून टाकली.

आपल्या संस्कृतीत रात्री आपण झाडाची फुलं काढत नाहीत आणि इथे ह्यांनी झाडांची कत्तल केली.

न्यायालय देखील रात्री निर्णय देतं तो देखील राज्य सरकारच्या बाजूने. ह्या सगळ्यावर आवाज कोण उठवणार?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *