Sun. Mar 7th, 2021

रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी ‘थलैवा’ रजनीकांत यांची लाखोंची मदत

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशावेळी सिनेमा, मालिका यांची शुटिंग्ज थांबवण्यात आली आहेत. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईज, इंडियन मोशन प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनच्या बैठकीत याविषयी निर्णय घेण्यात आलाय.  मात्र यामुळे निर्मात्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा होणार आहे. एवढंच नव्हे सिनेमांसाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न आणखी गंभीर आहे. अशा परिस्थितीत दक्षिण सिनेसृष्टीचा ‘थलैवा’ रजनीकांत त्यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांनी सेटवर काम करणाऱ्या कामगार आणि कलाकारांना आर्थिक मदत केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र आता चित्रिकरण बंद करण्यात आलं आहे. याचा परिणाम रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर आणि कलाकारांवर होणार आहे. अशावेळी त्यांच्या मदतीसाठी तामिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी पुन्हा एकदा आपण केवळ कलाकार म्हणूनच नव्हे तर माणूस म्हणूनही थोर असल्याचं दाखवून दिलं आहे. रजनीकांत यांनी सेटवर रोजंदारीवर काम करणाऱ्या कलाकार आणि कामगारांना लाखो रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे

फिल्म एम्पॉइज फेडरेशन ऑफ साऊथ इंडिया  या संस्थेला ५० लाख रुपयांची मदत रजनीकांत यांनी दिली आहे. याशिवाय इतर अनेक तामिळ सुपरस्टार्सनी रोजंदारीवरील कामगारांसाठी मदत देऊ केली आहे.

यापूर्वी मराठी नाटकाचे सुपरस्टार प्रशांत दामले यांनीही आपल्या नाट्यसंस्थेतील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी १० हजार रुपयांची मदत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *