राजू शेट्टी यांनी घेतली उदयनराजेंची भेट; उदयनराजेंकडे केली ‘ही’ विनंती

विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत असून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबत चांगलीच चर्चा रंगली असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान तुम्ही भाजपात प्रवेश करू नका अशी विनंती राजू शेट्टी यांनी उदयनराजेंकडे केली.
काय म्हणाले राजू शेट्टी ?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साताऱ्यात उदयनराजे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी भाजपात प्रवेश करू नये अशी विनंती उदयनराजे यांना राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे आणि लोकसभेत शेतकऱ्यांसह सामन्य जनतेचा आवाज बनवे असेही राजू शेट्टी म्हणाले.
राज्यात राजकीय परिस्थिती चांगली नसल्यामुळे भाजपात प्रवेश करू नये असेही सांगितले आहे.
शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रात मांडण्यासाठी विरोधी पक्षातील खासदार असणे गरजेचे असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले.