Sat. Feb 27th, 2021

राज्यसभा निवडणुका पुढे ढकलल्या

कोरोना व्हायरसने देशभरात धुमाकूळ घातल्यामुळे सर्वत्र जनता कर्फ्यू आहे. अशा परिस्थितीत २६ मार्चला होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आलाय.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा परिणाम निवडणुकांवरही झाला आहे. २६ मार्च रोजी होणाऱ्या निवडणुका आता पुढे ढकलण्यात आल्या आहे. मात्र निवडणुका कधी होतील, याची तारीख अजून जाहीर करण्यात आली नाही. पुढील परिस्थिती लक्षात घेऊन तारखा जाहीर करण्यात येतील, असं निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलंय.

महाराष्ट्रातील निवडणुकीवर परिणाम नाही

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, मणीपूर, मेघालय, आंध्र प्रदेश आणि झारखंड येथील राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 55 जागांपैकी १८ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणुका होणार होत्या. मात्र महाराष्ट्रातील जागा बिनविरोध होणार असल्यामुळे त्यावर परिणाम होणार नाही. त्यापैकी १८ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणुका पार पडणार होत्या.

शरद पवार, रामदास आठवले, हरिवंशराय नारायण सिंग यांच्याप्रमाणे ३७ जण बिनविरोध राज्यसभेवर निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेल्यांची संख्या-

महाराष्ट्र – 7,

तामिळनाडू- 6,

हरियाणा -2

छत्तीसगढ- 2

तेलंगणमधील – 2

बिहार – 5

पश्चिम बंगाल- 5

हिमाचल प्रदेश -1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *