Sat. Feb 27th, 2021

पुन्हा एकदा राखी सावंत चर्चेत…

कंट्रोवर्सी क्वीन राखी सावंतचा व्हिडिओ चर्चेत…

कंट्रोवर्सी क्वीन राखी सावंत सतत तिच्या इन्टाग्राम व्हिडिओमुळे चर्चेत असते. राखीच्या लग्नाची बातमी प्रचंड चर्चेत होती कारण राखीनी कुठल्या मुलाशी लग्न केलं आहे. हे जाणून घेण्यासाठी अनेकजण राखीला प्रश्न विचारत होते मात्र राखीने कधीच कोणाला तिच्या पतीबद्दल सांगत नव्हत.

सध्याला राखीचा एक व्हिडिओ इन्टाग्रामवर व्हायरल झाल आहेे. ज्यात राखी दु: खी दिसत आहेत. या व्हिडिओत राखी वारंवार बोलत आहे कि लग्न करू नका, लग्न करू नका. राखीच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे की राखी तिच्या लग्नामुळे खुश नाही. हा राखीच्या व्हिडिओ टिक टॅकचा आहे. राखी नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव असते. यापूर्वीही समोर आले आहेत, ज्यात ती खूपच दु:खी दिसत होती.

मीडिया रिपोर्टनुसार 28 जुलै रोजी राखी सावंतने मुंबईच्या जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये गुप्तपणे लग्न केले होतं. यापूर्वी या राखीच्या लग्नाचे वर्णन राखीने ब्राइडल फोटोशूट म्हणून केले होते. पण नंतर एनआरआयने व्यावसायिकासोबत लग्न उघड करून तिने सर्वांना चकित केले होतं पण आजपर्यंत कोणीही तिच्या पतीला पहिले नाही. राखीच्या पतीचे नाव रितेश आहे.

आजपर्यत राखीचा नवरा अद्याप समोर आला नाही. राखीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिच्या पतीला माध्यमांसमोर यायला आवडत नाही. रितेश व्यवसाय करतो, यामुळे तो प्रवास करत राहतो. जर ते माध्यमांसमोर आले तर संपूर्ण जग त्यांना ओळखेल आणि याचा परिणाम त्यांच्या कमावरती होईल असं राखीच म्हणणे होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *