‘या’ निर्णयासाठी राज ठाकरेंनी केलं मोदींचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारणार असल्याची घोषणा लोकसभेत केली. राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.
‘राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’ असे या ट्रस्टचे नाव ठेवण्यात आले आहे.
या निर्णयाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल त्यांनी ट्विट केलं आहे.
काय म्हणाले राज ठाकरे ?
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली.
या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला वेग येईल, असा आशावाद राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमधून व्यक्त केला.
अयोध्या मंदिर प्रकरणी घेतलेल्या या निर्णयायसाठी राज ठाकरे यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन केलं आहे.
तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राम मंदिर बांधण्याबाबतचे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
दरम्यान ९ फेब्रुवारीला मनसेतर्फे बांगलादेश आणि पाकिस्तानातील घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी मनसे मोर्चा काढणार आहे.