Thu. Nov 26th, 2020

शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नावे खंडणीची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या कार्यालयातून फोनवर खंडणी मागणाऱ्या टायपिस्ट महेश सावंत आणि त्याच्या साथीदाराला वर्ध्याच्या पुलई गावातून पोलिसांनी अटक केली आहे.

 

मनोज मानवटकर असं या महेशच्या साथीदाराचं नाव आहे. चांदूर रेल्वे येथील गजानन खंदार यानं भिकूजी महाराज संस्थान परिसराचा रेती घाट लिलावात खरेदी केली होता.

 

रेती घाट घेतल्यानंतर खंदारला महेश सावंत 2 महिन्यांपासून फोन करून पैसे मागत होता. 10 लाख रुपये द्यावे अन्यथा मंत्रालयामार्फत कारवाई करायला लावू अशी धमकी महेश खंदारेला

देत असे. तर, रामदास कदम यांच्या नावाचा गैरवापर करुन महेश धमकी देत होता. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *