Mon. Jan 17th, 2022

…मग रामदास स्वामी आणि शिवछत्रपतींच्या त्या स्मारकाचं सत्य काय?, नेटकऱ्यांचा सवाल

‘समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते’, असं ठामपणे सांगणाऱ्या शरद पवार या नव्या विधानाने वादाला तोंड फुटलंय. मात्र त्यांच्या या विधानाला छेद देणारी माहिती समोर आलीय.

समर्थ रामदास आणि छत्रपती शिवरायांचं नातं गुरू-शिष्याचे असल्याचं सांगणाऱ्या स्मारकाचं उद्घाटन दस्तुरखुद्द शरद पवार यांनी केल्याचा पुरावा समोर आलाय.

मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी पाटण तालुक्यातील शिंगणवाडी येथे स्वतः 26 एप्रिल 1990 रोजी समर्थ आणि शिवरायांच्या भेट आणि अनुग्रह घेतलेल्या संयुक्त स्मारकाचं उद्घाटन केलं.

रामदास शिवाजी महाराज यांचे भेट गुरु शिष्य याविषयी ‘दासबोधा’सह अनेक ऐतिहासिक ग्रंथामधून दाखले मिळतात.

जर समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे गुरू-शिष्य नव्हते तसंच समकालीनही नव्हते ही गोष्ट पवारांना तेव्हा ठाऊक नव्हती का? असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारला जातोय.

कोणतं आहे हे स्मारक?

शिंगणवाडी येथे 1689 साली समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक भेट झाली होती.

याठिकाणी रामदास स्वामींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनुग्रह घेतला, असा इतिहास असून त्या ठिकाणी हे स्मारक उभारण्यात आलं.

या स्मारकाचं उद्घाटन 1990 साली मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी केलं होतं.

त्यावेळी हे पवारांना माहीत नव्हते का, की पवार सोयीचं बोलतात असा सवाल नेटकऱ्यांकडून होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *